Monday, 29 April 2013

अश्वमेध यज्ञानंतर 15 वर्षांनी धृतराष्ट्र वनात जायला युधिष्ठिराची परवानगी मागतो ...

  आश्रम वासिक पर्व (15) अध्याय 1 ते 3 -

धृतराष्ट्राच्या मनात पश्चातापाचा उदय - वनात प्रस्थान करावयाचे निवेदन
 (ऑडिओ साठी इथे क्लिक करा)

अश्वमेध यज्ञानंतर ...उत्तम राज्यकारभार चालला असता ... धृतराष्ट्र युधिष्ठिराच्या राज्यात आश्रित म्हणून राहावे लागल्याने अंतःकरणात कुढत होता. विदुर, युयुत्सु व पांडवांनी त्यांची विचारपूस व सेवा करण्यात कधीच भेद केला नाही. युधिष्ठिराच्या प्रभावाने भीमसेनाशिवाय सर्व जण त्यांना योग्य सन्मान देत. परंतु भीमाबद्दल असलेली अढी व द्वेष धृतराष्ट्राला वारंवार त्रास देत असे.
मनातील सल पांडवांच्या प्रेमाने कमी होत होत 15 वर्षांनंतर तो एकदा म्हणाला, 'पंडुपुत्रांनो, मला माझ्या स्वार्थी व दुष्कर्मांची मला जाणीव झाली आहे. मला आता वनात जाऊन राहायची परवानगी तू द्यावीस. असे म्हटल्यावर उपस्थित व्यासांनी तशी अनुमती देण्याचे युधिष्ठिराला सुचवून 'विवेकाचा उदय वैराग्यातून होतो' असा उपदे केला. तेंव्हा त्यांना जायला परवानगी दिली जावी असे सुचवल्यावर, अति श्रमांनी घेरी आलेल्या धृतराष्ट्राच्या चेहऱ्याला युधिष्ठिराने अत्यंतिक प्रेमाने सुगंधी पाण्याने स्पर्ष केला तेंव्हा त्या प्रेमळ स्पर्षाने मोहरून गेलेल्या धृतराष्ट्राला आपल्या पुत्रांनी असा सेवा भावाने शरीर स्पर्ष कधी केला नव्हता याची प्रकर्षांने आठवण झाली.  धर्माच्या त्या हस्तस्पर्षांने पुत्र प्रेमाची अनुभूति त्याला झाली,  तेंव्हा उपस्थित सर्वांचे नयनाअश्रु पाझरले व शरीर गदगद झाले. असा तो ह्रदयस्पर्षी प्रसंग ऐकताना आपणही कसे नकळत भावनिक होतो... वनात जायला अनुमती व्यास देतात तेंव्हा त्यांनी केलेला सदुपदेश आदिचे कथन..