अतिभव्य यज्ञात हवन वेदपाठ, पशूंचे श्रपण व हवन केले गेले. यज्ञ मंडप चरबीच्या धुराने भरून गेले. युधिष्ठिराने व्यासांना पृथ्वीचा दान केले. त्यांनी ते दान कुंतीला परत दिले. अचानक एक मुंगुस यज्ञ भूमित लोळण करून कुरुक्षेत्रातील एका गरीब ब्राह्मणाच्या यज्ञदानाचे वर्णन करून मानवी भाषेत म्हणाला, 'हे राजन, माझी मात्र या यज्ञात निराशा झाली कारण या यज्ञातून केल्या गेलेल्या दानाची बरोबरी त्या यज्ञ दानाशी झाली नाही. विचारवंतांच्या बुद्धीला चालना देऊन मुंगूस निघून गेले. त्यावेळी चर्चेतून असे निष्पन्न झाले की सकाम यज्ञाचे फळ हे नेहमीच दुय्यम असते. युधिष्ठिराने केलेला यज्ञ मनः शांती व राज्यातील प्रजेच्या रक्षणासाठी व अन्य कारणांनी केला होता म्हणून तो सकाम होता. पण त्या गरीब ब्राह्मणाने केलेले आत्मयज्ञ दान हे याही पेक्षा श्रेष्ठ होते....
... युधिष्ठिराला केलेल्या दानाचा व वैभवाचा अहंकार होऊ नये म्हणून ही कथा घातलेली आहे....
ऑडिओ टेप इथे संपुर्ण कथनासाठी क्लिक करा
आज अनेक वर्षांनी हा ब्लॉग पहायला झाले. ९ हजार पेक्षा जास्त व्यक्तींनी काय आहे ते पहायला उत्सुकता दाखवली याचा आनंद झाला.
ReplyDelete